Wednesday, April 8, 2026
Homeक्राईमNashik Bribe News : लाच घेताना हवालदार जाळ्यात

Nashik Bribe News : लाच घेताना हवालदार जाळ्यात

नाशिक एसीबी अनभिज्ञ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Staion) मंगळवारी पहाटे उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा (Raid) टाकून पाच हजारांची लाच स्विकारणारा हवालदार संशयित संदीप दगू गांगुर्डे असे याला अटक केली. ‘प्रत्यक्ष पकडले जाऊ’, याची जाणीव होताच त्याने पळ काढून बाथरूममध्ये लपण्याचा प्रयत्न केला. मात्र एसीबी च्या पथकाने त्यास जेरबंद केले. पंचवटी पोलीस ठाण्यातच भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाई अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मुंबई (Mumbai) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर, राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दयानंद सावंत, पोलीस निरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत करण्याच्या बहाण्याने हवालदार गांगुर्डे याने १० हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने वरळी येथील प्रतिबंधक ारताच लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवली.

दरम्यान,या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली तेव्हा मंगळवारी पहाटे उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. हवालदार गांगुर्डे याने पाच हजार रूपये स्वीकारत तक्रारदाराने पथकाला इशारा केला. मात्र या हालचालींमुळे हवालदार गांगुर्डे हा लाचेच्या रक्कमेसह पोलीस ठाण्यातील बाथरूमकडे पळाला. एसीबी (ACB) पथकाने त्याचा पाठलाग करून बाथरूममधून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची रक्कमही ताब्यात घेण्यात आली.

नाशिक एसीबी अनभिज्ञ

तक्रारदाराने वरळीत तक्रार नोंदविल्याने मुंबई एसीबीने पंचवटीत येऊन हा सापळा यशस्वी केल्याचे समजते. मात्र, नाशिक एसीबीला या कारवाईची कोणतीही माहिती बुधवारी दुपारपर्यंत नव्हती. तक्रारदाराचा नाशिक एसीबीवर विश्वास नसल्याने त्याने तिकडे तक्रार नोंदविल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...