Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशAccident News : दोन बसेसचा भीषण अपघात! १२ जण ठार, ८ जखमी

Accident News : दोन बसेसचा भीषण अपघात! १२ जण ठार, ८ जखमी

दिल्ली | Delhi

सोमवारी पहाटे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १२ प्रवासी ठार झाले असून ८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ पुरुष, ४ महिला आणि २ अल्पवयीन आहेत. ओडिशामधील (Odisha) गंजम (Ganjam) जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. जखमींना तात्काळ एमकेसीजी मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गंजम जिल्ह्यातील दिगापहांडी पोलीस हद्दीत ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (OSRTC) आणि एका खासगी बसमध्ये हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

बेरहामपूरचे एसपी सरवण विवेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे एक वाजता झाला. दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. ओएसआरटीसी बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले बहुतांश प्रवासी खासगी बसमधील होते. ओएसआरटीसीची बस रायगडाहून भुवनेश्वरला जात होती, तर खासगी बस बेरहामपूरहून जिल्ह्यातील खंडादेउली गावातून लग्नाची पार्टी घेऊन परतत होती. दिगपहांडी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अनेक प्रवाशांची सुटका केली. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) माहिती दिली की ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गंजाम जिल्ह्यातील बस अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे आणि मृतांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

जुन्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा खून

- Advertisment -

ताज्या बातम्या