इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) भीषण अपघात (Accident) घडला असून या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी (Injured) झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर
याबाबत अधिक माहिती अशी की, कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईटजवळ (Break Fell Point) एका कंटेनरने सहा ते सात गाड्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत (Collison) गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : परिमंडळ दाेनमध्ये सरप्राईज कॉम्बिंग; ७७ टवाळांवर कारवाई
दरम्यान, घटनास्थळावर महामार्ग पोलीस (Mahamarg Police) रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तसेच आज वीकेंड असल्यामुळे कसारा घाटामध्ये वाहनांची (Vehicle) गर्दी होतांना दिसत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा