Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय (Nashik City Politics) वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील अंतर्गत कलहामुळे सुनील केदार यांनी शहराध्यक्ष पदाचा (City President) राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपला नाशिक महापालिकेत (Nashik NMC) ७२ जागांवर घवघवीत यश मिळाले होते. मात्र उमेदवारी वाटपावेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्य रंगले होते. तसेच इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील निष्ठावंत नाराज झाले होते.

दरम्यान, काल (मंगळवारी) भाजपकडून महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मछिंद्र सानप यांचे नाव निश्चित झाले होते. त्यावरून सुनील केदार नाराज असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. या सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदार यांनी प्रदेश कामिटीकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. नवीन शहाराध्यक्ष मिळेपर्यंत कामकाज बघणार असल्याचे सुनील केदार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...