Sunday, June 30, 2024
HomeनाशिकNashik News : पोलिस निरीक्षक झाले 'एसीपी'; गृहविभागाकडून १३९ अधिकाऱ्यांना बढती

Nashik News : पोलिस निरीक्षक झाले ‘एसीपी’; गृहविभागाकडून १३९ अधिकाऱ्यांना बढती

महसूली संवर्ग मागविले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

‘प्रमोशन’ची वाट पाहणाऱ्या राज्यातील १३९ पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) अखेर बढती (Promotion) मिळाली आहे. या अधिकाऱ्यांना सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधिक्षकपदी पदोन्नती देण्यात आली असून येत्या १८ जूननंतर या अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण कळविले जाणार आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील (Nashik City Police Commissionerate) तीन तर, एसीबीतील एक अशा चार अधिकाऱ्यांचा या पदोन्नतीत समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik News : मिरवणुकीने नवागतांचे शाळेत स्वागत

मागील एक ते दीड वर्षांपासून अनेक पोलीस घटकांत कार्यरत पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळेल, याची आस लागली होती. त्यानुसार पोलीस महासंचालक (Director General of Police) कार्यालयाच्या अधिपत्त्याखाली आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल यांनी (दि.१३) उशिरा १३९ पोलीस निरीक्षकांना पदोन्नत केल्याचे आदेश जारी केले. आता त्यानुसार, या पदोन्नत अधिकाऱ्यांना रिक्त जागांवर सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी महासंचालक(डीजी) कार्यालयाने सर्व घटक प्रमुखांना या अधिकाऱ्यांच्या महसुल संवर्ग, पसंती व इतर माहिती येत्या १८ जूनपर्यंत पाठविण्यास कळविले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

पवार, खटके, चौधरींचे प्रमोशन

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पीसीबीएमओबी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष कोंडाजी पवार, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शंकर शाहू खटके, नाशिक लाचलुचपत प्रचिबंधक विभागातील विश्वजीत जाधव आणि आयुक्तालयातील कुमार भिकाजी चौधरी यांना बढती देण्यात आली आहे. तर यापूर्वी नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलात काम केलेले अनिल चंद्रकांत शिंदे, राजेंद्र दामोदर कुटे, अशोक संभाजी भगत, कांतीलाल पाटील, संजय लोहकरे यांच्यासह इतरांचेही प्रमोशन झाले आहे.

हे देखील वाचा : महायुतीची नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न

नाशिक महसुलात १८ पदे रिक्त

नाशिक महसूल संवर्गातील आयजी ऑफिस, नाशिक पोलीस आयुक्तालय, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव एसपी कार्यालय, एमपीए, एसआयजी, सीआयडी, एसीबी, पीटीएस यासह इतर विभागांत ८३ सहायक आयुक्त/उपअधिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यातील ५५ पदे भरलेली असून उर्वरित अठरा पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक संवर्गासाठी किती पदे मंजूर होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या