Friday, May 3, 2024
Homeधुळेजिल्ह्यात नव्याने 14 पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात नव्याने 14 पॉझिटिव्ह रुग्ण

धुळे । प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात गेल्या 24 तासात नवीन 14 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. बाधितांची एकुण संख्या 14 हजार 581 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातील 75 अहवालांपैकी 2, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 10 अहवालांपैकी 1, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 64 अहवालांपैकी 1, महापालिका रॅपिड अँटीजन टेस्टमधील 176 अहवालांपैकी 1 व खाजगी लॅबमधील 23 अहवालापैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व 10 अहवाल धुळे जिल्ह्यातील निगेटिव्ह आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या