Monday, May 19, 2025
Homeनाशिककरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १४ अधिकाऱ्यांचा ‘वॉच’

करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १४ अधिकाऱ्यांचा ‘वॉच’

मालेगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर काम करित आहे. आरोग्य प्रशासनामार्फत बाधित रुग्ण तसेच त्यांच्या क्वारंटाईन केलेल्या नातेवाईकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

आरोग्य प्रशासनातील प्रत्येक घटक हा त्याची जबाबदारी पार पाडत असतांना येणाऱ्या प्रशासकीय बाबींच्या पूर्तता व अडचणींचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दोन याप्रमाणे 14 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

रुग्णालयातील कामकाज सुरळीत चालु आहे किंवा नाही, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित आहेत किंवा नाही, त्यांना येणाऱ्या अडचणींसह प्रशासकीय बाबींच्या पूर्तता व रुग्णांच्या अहवालासह त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याबरोबर रुग्णालयातील संपुर्ण कामकाजावर सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात सनियंत्रण अधिकारी नियुक्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

बडी मालेगाव, मन्सुरा हॉस्पीटल, जीवन हॉस्पीटल, फरानी हॉस्पीटल, आय.एच.एस.डी.पी.,  या.ना.जाधव हायस्कुल, जाट मंगल कार्यालय, चाळीसगाव फाटा, मालेगांव या सातही ठिकाणी दोन शिफ्टमध्ये  या 14 अधिकाऱ्यांची नियुक्ती असून या अधिकाऱ्यांमार्फत रुग्णालयातील कामकाजाचे सनियंत्रण करण्यास मदत होणार अाहे.

सोपविण्यात आलेल्या जबाबदारी मध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंध कायदा 1897 तसेच भा.द.वि.1860 मधील कलम 188 आणि शासनाच्या प्रचलित अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : न्यायालयाच्या अटींचा भंग, कर्जदाराला दणका !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर अर्बन बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात येथील जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना संशयित आरोपी कर्जदार सुशिल घनशाम अगरवाल याचा अटकपूर्व जामीन रद्द...