धुळे – Dhule
जिल्ह्यात दिवसभरात 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या 1591 इतकी झाली आहे.
भांडणे, साक्री सीसीसी येथील 16 अहवालांपैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. साक्री येथील बाजारपेठेत 28 वर्षीय पुरुष आणि पिंपळनेर येथील माळी गल्लीत 20 वर्षीय महिला बाधीत आढळली आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 26 अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 13 वर्षीय बालिका महादेवपूरा, 6 वर्षीय बालक सुराय शिंदखेडा, 28 वर्षीय महिला पाटण शिंदखेडा यांचा समावेश आहे.
शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथील 23 अहवालांपैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 43 वर्षीय पुरुष सुभाष कॉलनी, 22 वर्षीय पुरुष होळनांथे यांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील 26 अहवालांपैकी आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात धुळे शहरात सात रुग्ण बाधीत आढळले आहेत. रुग्णांमध्ये आग्रारोड दोन, मनोहर चित्र मंदिरमागे एक, मोगलाई एक, तेली गल्ली एक, मालेगाव रोड एक, ग.नं.4 एक यांचा समावेश आहे. लळींगमध्येही एक रुग्ण आढळून आला आहे.
धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1591 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 922 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 75 जणांचा कोरोनाने जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.