Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशरील्स बनवणं बेतलं जीवावर; रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

रील्स बनवणं बेतलं जीवावर; रेल्वेच्या धडकेत १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

हैदराबाद | Hyderabad

सेल्फीची क्रेझ आता रील्स आणि व्लॉगवर येऊन पोहोचली आहे. अनेक युवक दररोज सोशल मीडियावर रील्स अपलोड करत आहेत. मात्र रील्सच्या नादात एक धक्कदायक घटना घडली असून एका १६ वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. हैदराबाद येथील ही घटना असल्याची माहिती मिळत आहे…

- Advertisement -

रेल्वेच्या रुळाशेजारी उभे राहून रिल्ससाठी शुंटीग करणाऱ्या युवकाला रेल्वेने जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहम्मद सरफराज असे या युवकाचे नाव आहे. रिल्स शूट करणारे सरफराजचे दोन मित्र दूर गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

Wrestlers Protest : कुस्तीपटूंना आता शेतकऱ्यांची साथ, बॅरिकेट्स तोडत आंदोलनात सहभागी… पाहा Video

याबाबत अधिक माहिती अशी की, हैदराबाद येथील तीन मित्र इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी रेल्वे ट्रॅकवर गेले होते. सरफराज रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ उभा होता. त्याचे दोन मित्र समोरुन व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Accident : एसटीची दुधाच्या वाहनाला जोरदार धडक; चार प्रवासी जखमी

रेल्वेच्या स्पीडचा आणि आपण ट्रॅकच्या किती जवळ उभे आहोत याचा अंदाच न आल्याने सरफराजला रेल्वेनी जोरदार धडक दिली. यात सरफराजचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याच्या दोन्ही मित्रांनी रेल्वेचा अंदाज घेत बाजूला उडी मारली.

- Advertisment -

ताज्या बातम्या