Sunday, May 4, 2025
Homeनाशिकदिलासादायी : नाशिकमधील पहिला कोरोनाबधित रुग्ण ‘कोरोनामुक्त’; मालेगावमधील तिघांच्या चाचण्या निगेटिव्ह

दिलासादायी : नाशिकमधील पहिला कोरोनाबधित रुग्ण ‘कोरोनामुक्त’; मालेगावमधील तिघांच्या चाचण्या निगेटिव्ह

नाशिक l प्रतिनिधी

जिल्ह्यातील आणि निफाड तालुक्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच आज आलेल्या अहवालात मालेगावमधील तीन कोरोना बाधित रुग्णांचे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाशिकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी याबाबतची माहिती दिली. आज सायंकाळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 14 नवे संशयित दाखल झाले असून त्यांच्या घशाचे स्राव घेऊन तपासणीला पाठविण्यात येणार आहे.

तसेच 118 संशयितांची अहवाल अद्याप येणे बाकी असून यात मालेगावमधील कोरोना बाधित रुग्णांच्या 92 नातेवाईकांचा समावेश आहे.

तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांमधील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, आज चार कोरोनाबधित रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनाचा जीव भांड्यात पडला असून नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये काविळचा दुसरा बळी

0
राजूर |वार्ताहर| Rajur अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळच्या साथीने रौद्र रूप घेतले असून दुसर्‍या रुग्णाचा बळी घेतला आहे. मिसबाह इलियास शेख (वय13) या मुलीचा मृत्यू...