Saturday, July 27, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 2 केंद्र

नेवासा तालुक्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 2 केंद्र

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर एक केंद्र महाविद्यालयास देण्यात आले आहे. यात सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

- Advertisement -

परंतु नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशांत गडाख अध्यक्ष मुळा एज्यु सोसायटी सोनई यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांचेशी संपर्क करून नेवासा तालुक्यात मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई व ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा या दोन केंद्रांना मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यातील अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या सर्वच विभागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून जवळच अंतिम वर्षाची परीक्षा करोनाची काळजी घेत देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या