दिल्ली | Delhi
यंदाचे आयपीएल दुबईमध्ये होत आहे. मात्र तरीही आयपीएलला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आयपीएलबाबत लोकांमध्ये उत्साह पाहण्यास मिळत असून, पहिल्या सामन्यापासून कोट्यावधी लोक यंदाच्या आयपीएलचा आनंद घेताना पाहण्यास मिळत आहे.
प्रेक्षक इंटरनेटच्या माध्यमातून आयपीएलशी जोडलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे आयपीएलच्या पहिल्याच सामन्याने व्यूअरशिपचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आयपीएलचा पहिला सामना तब्बल 20 कोटी लोकांनी पहिला असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समधील पहिला सामना जवळपास 20 कोटी लोकांनी पाहिला. हा एक विक्रमच आहे. ड्रीम 11 आयपीएलने नवीन रेकॉर्ड केला आहे. बार्कनुसार, 20 कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशात कोणत्याही स्पोर्ट्सलीगसाठी ही सर्वोत मोठी ओपनिंग व्यूअरशिप आहे. ही एकूण स्टारस्पोर्ट्स इंडिया आणि डिज्नी+ हॉटस्टारची व्यूअरशिप आहे.”