Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? यादी जाहीर

प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? यादी जाहीर

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी अनुक्रमे ध्वजवंदन आणि ध्वजारोहणाची संधी देण्याची मागणी करणारे मंत्री भरत गोगावले यांची दीर्घ प्रतीक्षा बुधवारी संपली. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल, असे सामान्य प्रशासन आज जारी केलेल्या शासन परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे यंदा रायगडमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करण्याची महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची संधी हुकली आहे.

YouTube video player

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने आज प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदनाबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. रायगड पालकमंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोगावले यांना मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनाचा मान मिळाला आहे.

देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी पार्क, दादर येथे सकाळी सव्वानऊ वाजता ध्वजवंदन होईल. तर राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री,मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येईल.

राजशिष्टाचार विभागाच्या परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात तर सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल.

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे
पालघर : गणेश नाईक, जळगाव : गुलाबराव पाटील, अमरावती : दादाजी भुसे, यवतमाळ : संजय राठोड, मुंबई शहर : मंगल प्रभात लोढा, रत्नागिरी : उदय सामंत, धुळे : जयकुमार रावल, जालना : पंकजा मुंडे, नांदेड : अतुल सावे, चंद्रपूर : डॉ.अशोक उईके, सातारा : शंभुराज देसाई, मुंबई उपनगर : अ‍ॅड.आशिष शेलार, वाशिम : दत्तात्रय भरणे, लातूर : शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार : योगेश कदम , सोलापूर : जयकुमार गोरे, हिंगोली : नरहरी झिरवाळ, भंडारा : संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट, धाराशिव : प्रताप सरनाईक, बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील), सिंधुदुर्ग : नितेश राणे, अकोला : आकाश फुंडकर, कोल्हापूर : प्रकाश आबिटकर, गडचिरोली : अ‍ॅड.आशिष जयस्वाल, वर्धा : डॉ. पंकज भोयर आणि परभणी : मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर, गोंदिया-इंद्रनील नाईक

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाचा पंचनामा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेला अंमली पदार्थ (ड्रग्ज) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शामसुंदर विश्वनाथ गुजर याने अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील जप्त मुद्देमाल...