Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : शहर पोलीस भरतीला पहिल्याच दिवशी २१६ उमेदवारांची दांडी

Nashik News : शहर पोलीस भरतीला पहिल्याच दिवशी २१६ उमेदवारांची दांडी

४३ उमेदवार उंचीअभावी अपात्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत बुधवारपासून (दि.१९) मैदानी चाचणीला सुरुवात झाली. त्यावेळी पहिल्यांदाच ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेटिंफिकेशन’चा वापर करुन धावण्याच्या चाचणीतील गुण नमूद करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यातून नाशिकमध्ये (Nashik) मध्यरात्री दाखल होत पहाटे पाचनंतर सोळाशे मीटर धावल्यानंतर दिवसभरात शंभर मीटर व गोळाफेकची चाचणी उमेदवारांनी पूर्ण केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा प्रवास

पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) शहर आयुक्तालयातील ११८ रिक्त रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणीला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पाचशेपैकी ४४३ उमेदवारांनी मैदानी चाचणीची पात्रता फेरी पूर्ण केली.भरतीच्या पहिल्याच दिवशी ५०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. परंतु, पहिल्याच दिवशी २१६ उमेदवारांनी मैदानी चाचणीला पाठ दाखविली. २८४ उमेदवारांनी मैदानी चाचणीला हजेरी लावली.

हे देखील वाचा : आठवड्यासाठी नाफेडचा कांदा दर 2,555 रुपये

यातील २४१ उमेदवारांनी (Candidates) चाचणीसाठी पात्र झाले. तर, ४६ उमेदवार उंची व छातीमध्ये अपात्र ठरले होते. परंतु यातील काही उमेदवारांनी अपिल केले असता, त्यांची पुन्हा शारीरिक मोजमाप घेण्यात आले असता, यातील तिघे पात्र ठरले. त्यामुळे एकूण ४३ उमेदवार उंची व छातीमध्ये अपात्र ठरले आहेत.शहर पोलिसांची मैदानी चाचणी हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर पहाटे पाच वाजेपासून सुरू झाली. तर ग्रामीण पोलिसांची (Rural Police) चाचणी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयासमोरील कवायत मैदानात होत आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : २० जून २०२४ – समाज माध्यमांच्या वापराबाबत कडेलोटाची वेळ?

तसेच भरतीसाठी बाहेरगावाहून विद्यार्थी येत असल्याने त्यांच्याकडील कागदपत्रे पडताळणीत काही अडचणी उद्भवल्याचे दिसले. त्वरित झेरॉक्स व फोटो उपलब्ध व्हावेत, म्हणून मैदानातच झेरॉक्स आणि फोटोसाठीचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासह ज्या उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन थेट उपायुक्त व अधीक्षकांमार्फत होत आहेत. त्यामुळे अपिलांची संख्या नगण्य असून, अपिलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : “विरोधात जबाब दिल्यास ठार मारु”; धमकी देणाऱ्या सराईतांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

दरम्यान, शहर पोलिस (City Police) दलात ११८ जागांसाठी ५ हजार ५९० पुरुष, २ हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत.तृतीयपंथी उमेदवारांनी महिला गटातून अर्ज दाखल केल्याची माहिती आयुक्तालयाने दिली. तर ग्रामीण दलात ३२ जागांसाठी २ हजार ६०२ पुरुष, ५७६ महिला, ४२ माजी सैनिक व इतर पाच उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत.

अशी सुरु आहे भरती

१) ध्वनीक्षेपकाद्वारे उमेदवारांसह अंमलदारांना सूचना
२) प्रवर्गनिहाय कागदपत्रे पडताळणी, मैदानातच संगणक कक्ष
३) उपायुक्त, सहायक आयुक्त, अपर अधीक्षक दिवसभर मैदानातच
४) आयुक्त, अधीक्षकांचे ‘मिनी कार्यालय’ कार्यान्वित
५) १००, १६०० मीटर, गोळाफेकीसह सर्व चाचणीचे चित्रीकरण
६) गुण नोंदवल्यावर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या
७) गुणांसह चाचणीच्या तपशिलांचे फलक
८)एका तुकडीत २० उमेदवार, पहाटेच धावण्याची चाचणी पूर्ण

५.१० मिनिटांची धाव

१६०० मीटर धावण्याची चाचणी ग्रामीण पोलिसांनी आडगावलगतच्या डांबरी रस्त्यावर तर शहर पोलिसांनी मीनाताई ठाकरे स्टेडिअमच्या सिंथेट्रिक ट्रॅकवर घेतली. यावेळी गुणवत्ता यादीत येण्यासाठी ७ मिनिटांपैकी ५.१० मिनिटांत धाव पूर्ण करण्यात उमेदवारांची कसोटी लागली. त्यावेळी काहींची दमछाक झाल्याचे दिसले. तर अनेक उमेदवारांनी पाच मिनिटांत धाव पूर्ण करुन अधिक गुण मिळविले. विशेष म्हणजे, सोळाशे मीटर, शंभर मीटर व गोळाफेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी दर्शविली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या