Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

बजेटमधील घरांपासून लक्झरी विलापर्यंत सर्व काही एकाच छताखाली; सिने अभिनेते मिलिंद गुणाजींच्या उपस्थितीत उद्घाटन


- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik
दैनिक ‘देशदूत’ आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते आज (दि.२३) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष तथा ठक्कर ग्रुप लिमिटेड(टिजीएल)चे संचालक गौरव ठक्कर, ब्रम्हेचा इस्टेटचे संचालक विजय ब्रम्हेचा व प्रितेश ब्रम्हेचा यांसह नाशिकमधील नामवंत बांधकाम व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत.

YouTube video player

हे प्रदर्शन २३ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत ब्रम्हेचा इस्टेट, सावरकर नगर कॉर्नर, भोसला मिलिटरी कॉलेज समोर, गंगापूररोड येथे भरविण्यात आले आहे. टायटल स्पॉन्सर ‘दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ तर को स्पॉन्सर ‘ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल)’ हे आहेत. नाशिकमधील सर्वात प्रतिष्ठित आणि निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या गंगापूररोडसह, कॉलेजरोड, सिरीनमेडोज, आनंदवल्ली, पाईपलाईनरोड, धृवनगर परिसर, चांदसी, महात्मानगर आणि अन्य परिसरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.

गंगापूररोड आणि कॉलेजरोड ही नाशिकची ओळख आहे. हे दोन्ही परिसर शहराच्या विकासाचे आणि जीवनशैलीचे केंद्रबिंदू मानले जातात. गंगापूररोड हा नाशिकमधील एक उच्चभ्रू आणि वेगाने विकसित होणारा भाग आहे. येथे आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तर कॉलेजरोड हा गजबजलेला, व्यावसायिक आणि शैक्षणिक केंद्र असलेला भाग आहे. खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनासाठी येथे विविध प्रकारची दुकाने, ब्रँडेड शोरूम्स, कॅफे, रेस्टॉरंट्स आणि मल्टिप्लेक्स आहेत. गंगापूररोडचा काही भाग गोदावरी नदीच्या सान्निध्यात असल्याने येथील आल्हाददायक वातावरण सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शॉपिंग मॉल्स, ब्रँडेड शोरूम्समुळे येथे राहणे प्रतिष्ठेचे मानले जाते. शिवाय सातपूर औद्योगिक वसाहत जवळ असल्याने नोकरी-व्यवसायासाठी हा परिसर सोयीचा आहे. प्रदर्शनास मीडिया या जाहिरात एजन्सी व पपायाज् नर्सरीचे सहकार्य लाभले आहे. विकेंड आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून नाशिककरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एकाच छताखाली शेकडो गृह, व्यावसायिक प्रकल्प
नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित बांधकाम व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. येथे बजेट होमपासून ते अतिशय आलिशान फ्लॅट्स, विला, रो-हाउसेस, रो बंगलो, तसेच एन.ए. प्लॉट्सचे भरपूर पर्याय उपलब्ध असतील.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ठक्कर ग्रुप लिमिटेड (टिजीएल), पार्कसाईड रेसिडेन्सी, रोहन इंटरप्रायझेस, निशम डेव्हलपर्स, सेवा रियल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, साठे बिल्डर्स, की स्टोन कन्स्ट्रक्शन, आकार बिल्डकॉन, कोटकर ब्रदर्स, अर्बन साइट्स, अमित लाईफ स्पेस एलएलपी, ए.एम.आर. डेव्हलपर्स, अनंतारा, पूजा कन्स्ट्रक्शन्स, बी-ऑर्बिट ग्रुप, सी.डी.आय.एल.-फार्म प्लॉट्स, राजेंद्र बिल्डर्स, महाकाल बिल्डर्स, सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ऋषीराज ग्रुप, मिन्का रिव्हरडेल, नंदन बिल्डर्स, श्रीयोग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री बालाजी डेव्हलपर्स, शिल्पा इस्टेट

ताज्या बातम्या

टॅरिफ

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025...