नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
वडनेर गेट येथे पुन्हा एकदा बिबट्याने एका दोन वर्षाच्या श्रुतिक या बालकावर हल्ला करून ओढून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकारामुळे पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान संबंधित मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दीड ते दोन महिन्यापूर्वी वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून शेतात ओढून नेले होते त्यानंतर या हल्ल्यात आयुष्य याचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच परिसरात असलेल्या वडनेर गेट परिसरातील कारगिल गेट च्या बाजूला असलेल्या क्वार्टर जवळ बिबट्याने दोन वर्षाच्या बालकाने हल्ला करून त्याला ओढत नेले.
दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिक तसेच ग्रामस्थ त्याचप्रमाणे माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाली असून संबंधित बालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ही माहिती देण्यात आली आहे.




