नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूर धरण परिसरातील (Gangapur Dam Area) आकाशात शुक्रवारी (दि. २३) दुपारी भारतीय वायुदलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकांमुळे जणू इंद्रधनुष्य अवतरल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिककरांनी (Nashik) घेतला. दोन दिवस चाललेल्या या नेत्रदीपक एरोबॅटिक शोचा समारोप ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात करण्यात आला.
भारतीय वायुदल व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील ‘नाशिक फेस्टिव्हल’ अंतर्गत हा दोन दिवसीय एसोबॅटिक शो गंगापूर धरण परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व सैन्यदलाचे अधिकारी उपस्थित होते. संत-महंतांनीही भारतीय वायुदलाच्या (Indian Air Force) क्षमतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
सूर्यकिरण टीमने हॉक-१३२ या विमानांद्वारे अचूक समन्वय साधत थरारक प्रात्यक्षिके सादर केली. स्कॉइन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, विष्णु, अंकित वशिष्ठ, संजय सिंह, विग कमांडर जसबीर सिंह व अभिमन्यू त्यागी यांनी आपल्या कौशल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आकाशात ‘घ’ अक्षर, बाण, मिग विमानाची आकृती तसेच प्रेमाचे प्रतीक असलेले हृदय साकारत रंगांची उधळण केली. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली, तर प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन पलाईट लेफ्टनंट कवल संधू यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांनी परिश्रम घेतले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आपदा मित्र, स्वयंसेवक, लाईफ जॅकेटस्, श्रो बैग्स व आवश्यक उपकरणांसह पथके सज्ज ठेवण्यात आली होती, गंगापूर-गिरणारे रोडवर १४ विविध पार्किंग स्थळे उभारून वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याने रस्त्यावरील कोंडी टाळणे शक्य झाल्याचे नाशिककरांनी सांगितले. गंगापूर धरणात आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून सातत्याने गस्त मुरू होती. कार्यक्रमापूर्वी ऑलिम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली नोकानयनाची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले की, अशाप्रकारचे एरोबॅटिक शो तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण करतात व सैन्यदलात भरतीसाठी प्रेरणा देतात. कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पूर्वतयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाशिकमध्ये प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आल्याने शहराच्या वैभवात भर पडल्याचे सांगितले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या एरोबॅटिक शोमुळे नाशिकचे नाव जागतिक स्तरावर पोहोचल्याचे सांगत, नागरिकांनी समाज माध्यमांद्वारे नाशिकचे इंडिंग करून पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन केले. सूर्यकिरण टीमने नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानत शोचा समारोप केला.
फायर कलरची निर्मिती नाशकात
शेवदच्या प्रात्यक्षिकात आकाशात केशरी, मावरा आणि हिरवा रंग उधळत बलशाली भारताचे प्रतीक साकारण्यात आले. ‘भारत माता की जय’च्या जयघोषात गंगापूर धरण परिसर दुमदुमून गेला. या तिस्थाच्या धुरासाठी वापरण्यात आलेले रंग (फायर कलर) नाशिक मध्येच बनवण्यात आल्याची माहिती सूर्यकिरण टीसद्वारे देण्यात आली. नाशिककरांनी ही बाब अभिमानाची अरुल्याची भावना व्यक्त केली.





