रावेर|प्रतिनिधी Raver
खानापूर येथील बँक व्यवस्थापक (Bank manager) याने २३ वर्षीय युवतीला लग्नाचे आणि नोकरीवर लावून देण्याचे आमिष देऊन अत्याचार केल्याप्रकरणी रावेर पोलिसांत (Raver Police) गुन्हा दाखल झाला आहे.
- Advertisement -
आरोपी नितीन यशवंत शेंडे हा खानापूर सेंट्रल बँकेत (Central bank) शाखा व्यवस्थापक असून त्याने त्या मुलीस लग्नाचे व नोकरीवर लावून देण्याचे आमिष देऊन त्याच्या स्टेशन रोड व विद्या नगर येथील राहत्या घरी तसेच बऱ्हाणपूर (Barhanpur) येथील हॉटेल उत्सवमध्ये अत्याचार केल्याचा गुन्हा रावेर पोलिसात पीडित युवतीच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री दाखल करण्यात आला आहे. यात आणखी चार जणांनी फिर्यादीला धमकी आणि शिविगाळ केल्याप्रकरणी त्यांचा देखिल गुन्ह्यात समावेश आहे.