नाशिक । Nashik
नाशिक शहरात तसेच जिल्हात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
मात्र मागील 24 तासात 1 हजार 468 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा 70 हजार 297 वर पोहचला आहे. तर 1 हजार 41 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 61 हजार 339 वर पोहचला आहे. तर दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक 26 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 1 हजार 468 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 57 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 47 हजार 900 वर पोहचला आहे.
आज ग्रामिण भागातील 375 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 18 हजार 366 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 27 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 592 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 439 झाला आहे.
मात्र दुसरीकडे करोनावर मात करणार्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 1 हजार 41 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 61 हजार 339 वर पोहचला आहे.
करोनामुळे आज 26 रूग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत सर्वाधिक 20 रूग्णांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्यामध्ये 15 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. तर ग्रामिण भागातील 11 रूग्णाचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 275 इतका झाला आहे.
याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडा वाढत आहे. 24 तासात 2 हजार 692 रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरात 2 हजार 489, ग्रामिण व गृह विलगीकरण 160, मालेगाव 24, जिल्हा रूग्णालय 12, डॉ. पवार रूग्णालय 7 रूग्णांचा समाावेश आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार
* एकूण करोना बाधित : 70,297
* नाशिक : 47,900
* मालेगाव : 3,592
* उर्वरित जिल्हा : 18,366
* जिल्हा बाह्य : 439
* एकूण मृत्यू: 1275
* करोनामुक्त : 61,339