दिल्ली । वृत्तसंस्था Delhi
जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगर मध्ये दाखल झाले आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपण व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशाराच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन दिला आहे.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून श्रीनगरला गेल्यावर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचीगृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे .
अमरनाथ यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या आधी झालेल्या या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं असून ऐन पर्यटनाच्या हंगामात झालेल्या या घनटेमुळं खळबळ उडाली आहे. पहलगाममधील अशा भागात हा हल्ला झाला आहे जिथं केवळ पायी किंवा घोड्यांवरून जाता येतं. या हल्ल्यात काही घोडेही जखमी झाल्याचे वृत्त आहे.