Thursday, April 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक 26/11/2024 रोजी अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीकडून कोयता, चॉपर, आधुनिक धनुष्यबाण तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

- Advertisement -

आरोपी युवराज मोहन शिंदे (वय 39, रा. तळेगाव काचुर्ली, ता. त्रंबकेश्वर, सध्या रा. सातपूर, नाशिक) याने मागील एका वर्षापूर्वीच्या वादाचा बदला घेण्यासाठी मयत विष्णु गांगुर्डे याचा पाठलाग करून मोटारकारने धडक देत खून केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता नाशिक जिल्ह्यात त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे तसेच तो सदर खुनाच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व त्यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

पडसाद : शितावरून भाताची परीक्षा…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक कोणत्याही निवडणुकीत कोणालाही बहुमत न मिळणे हे जसे लोकशाहीला धोकादायक समजले जाते, तद्वतच एखाद्या पक्षालाच पाशवी...