Sunday, March 30, 2025
Homeजळगावजिल्हा बँकेसाठी 279 उमेदवारी अर्ज, बुधवारी छाननी

जिल्हा बँकेसाठी 279 उमेदवारी अर्ज, बुधवारी छाननी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Co-operative Bank) निवडणुकीच्या (Election) उमेदवारी अर्ज (candidature application) भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज भाजपसह इतर पक्षातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या आवारात प्रचंड गर्दी केली होती. आज दिवसभरात 174 इच्छुकांनी (Interested candidates) अर्ज भरले (filled the application) असून आतापर्यंत सुमारे 279 जणांनी उमेदवारी अर्ज भरले दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी(Returning Officer) तथा जिल्हा उपनिबधंक संतोष बिडवाई (Santosh Bidwai) यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी निवडणुक होत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय पॅनलसाठी मोट बांधली होती. त्यासाठी दीड महिन्यांपासून सर्वच पक्षांनी संमती दाखवित कोअर कमिटीच्या बैठका देखील पार पडल्या. या बैठकांमध्ये जागा वाटपांवर देखील शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु काँग्रेसने भाजपसोबत निवडणुक लढविण्यास नकारदिल्यानंतर राष्ट्रवादीने देखील हेच कारण पुढे केल्याने सर्वपक्षीय पॅनलचा बार फुसका निघाला. परंतु बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सर्वच पक्षांकडून स्वबळावर निवडुकीसाठी तयार असल्याने त्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहे. यात आतापर्यंत 279 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्ज दाखल करतांना अनेक उमेदवारांची चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र आज जिल्हा बँकेत दिसून आले.

जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली तर अनेकांना कागदपात्रांनी चांगलाच घाम फोडला.

निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी संतोष बिडवई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले. यावेळी निवडणूक निरिक्षक तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनीही जिल्हा बँकेत भेट देऊन निवडणुकीचा कामकाजाचा आढावा घेतला

बुधवारी छाननी प्रक्रिया

जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी आतापर्यंत 279 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. या अर्जांची छाननी उद्या दि. 20 रोजी होणार असून सकाळी 11 वाजता छाननीच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. या दिवशी कुणाचे अर्ज बाद होतात? याकडे आता लक्ष लागुन राहिले आहे.

नेतेमंडळींची मांदियाळी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून इच्छुक उमेदवारांसह सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी बँकेत हजेरी लावली होती. यामध्ये आ. मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, आ. अनिल पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, माजी खा. ए. टी. पाटील, तिलोत्तमा पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, संजय पवार, विकास पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी बँकेत हजेरी लावली होती.

या उमेदवारांनी दाखल केले अर्ज

आ. चिमणराव पाटील, वाल्मिक पाटील, प्रकाश पाटील, गोकुळ पाटील, संगिता पाटील, रामदास पाटील, अरुणा पाटील, विकास पवार, विनोदकुमार पाटील, पुनम पाटील, संजय पवार, प्रताप पाटील, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, गुलाबराव देवकर, सतिष शिंदे, रोहीदास पाटील, तिलोत्तमा पाटील, लिलाधर तायडे, आ. अनिल पाटील, कल्पना पाटील, घनश्याम अग्रवाल, अर्जुन पाटील, अ‍ॅड. रविंद्र पाटील, सुरेश चौधरी, संजय पाटील, विष्णू भंगाळे, विष्णू सोनार, माजी मंत्री एकनाथराव खडसे, अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर, आ. किशोर पाटील, अनिल पाटील, नथ्था अहिरे, इंदिराबाई पाटील, अरुण पाटील, हरिचंद पाटील, सीमा पाटील, दीपकसिंग राजपूत, नानासाहेब देशमुख, रविंद्र के. पाटील, जनाबाई महाजन, मंदाकिनी पाटील, हरिष पाटील, कल्पना देवकर, सतिष देवकर, शरद पाटील, महेंद्र सपकाळे, नाना पाटील, अमोल पाटील, मेहताबसिंग नाईक, प्रशांत चौधरी, विजय पाटील, सुरेश पाटील, रोहीत निकम, शैलजादेवी निकम, विकास वाघ, शामकांत सोनवणे, सोनल पवार, अविनाश भालेराव, रमण भोळे, अशोक टी. पाटील, उषाबाई पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कैलास पाटील, आ. संजय सावकारे, संगिताबाइ पाटील, प्रशांत पवार, पद्माकर गोसावी, गणेश नेहते, महानंदा पाटील, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, राजू देशमुख, प्रदीप देशमुख, प्रमोद पाटील, राजकमल पाटील, कैलास सरोदे, शांताराम धनगर, नामदेव बाविस्कर, संगिता पाटील, निवृत्ती पाटील, माजी आ. संतोष चौधरी, योगेश पाटील, राजेंद्र चौधरी, नंदकिशोर महाजन, संजय पाटील, महापौर जयश्री महाजन, आ. राजूमामा भोळे, दिलीप पाटील, जयश्री सोनवणे, भरत बिरारी, ज्ञानेश्वर महाजन, आ. मंगेश चव्हाण, भारती पाटील, श्रावण ब्रह्मे, अलकाबाई पाटील, करण पाटील, माजी आ. स्मिता वाघ, छायाबाई महाजन, राजीव पाटील, अस्मिता पाटील, सचिन चौधरी, खा. उन्मेष पाटील, विनायक पाटील, गोविंद अग्रवाल, शोभा पाटील, शिवाजी ढोले, प्रकाश सरदार, लिलाबाई पाटील, मुबारक तडवी, हितेंद्र तायडे, महेश मंडोरे, विजय महाजन, राजेश राठोड, अशोक खलाणे, निलेश पाटील, खिलचंद इंगळे, भारत पाटील, भारती चौधरी, शांताराम धनगर, उमाकांत पाटील, बाबुलाल मोरे, पंकज मुंदडे, नामदेव बाविस्कर, देवकाबाई परदेशी, मंगेश पाटील, खा. रक्षा खडसे, सुरेश धनके, प्रल्हाद सपकाळे, आबासाहेब निकम, रविंद्र के. पाटील, राजेंद्र शिंदे, उदयसिंह पाटील, रविंद्र एस. पाटील, नितीन चौधरी, माहेश्वरी देशमुख, आनंदाराम देशमुख, माधुरी अत्तरदे, जयश्री सुर्यवंशी, कैलास सुर्यवंशी, डिगंबर चव्हाण, विजय बारी, प्रशांत पवार, हरिचंद्र पाटील, रविंद्र डी. पाटील, सुलोचना पाटील, रुद्रेंद सुर्यवंशी, रविंद्र पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या