Friday, May 3, 2024
Homeधुळेधुळे : नवीन २९ पॉझिटिव्ह रुग्ण ; वृध्दाचा मृत्यू

धुळे : नवीन २९ पॉझिटिव्ह रुग्ण ; वृध्दाचा मृत्यू

Dhule – धुळे – प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 29 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यात धुळे शहरातील 11 रूग्णांचा समावेश आहे. शहरातील रामचंद्र नगरातील 86 वर्षीय वृध्दाचा दुपारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. दरम्यान जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 1 हजार 765 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 80 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दुपारी चार वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर जिल्हा रुग्णालयातील 46 अहवालांपैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील 7 धुळे जिल्ह्यातील असून 2 अमळनेर (जि. जळगाव ) येथील आहे. सातमध्ये जापी (ता.धुळे) 2, देवपूर 1, देविदास कॉलनी जुने धुळे 1, सप्तशृंगी कॉलनी साक्री रोड 2, काझी प्लॉट 1, झाडी (ता.अमळनेर) येथील 2 रूग्णांचा समावेश आहे. महापालिका पॉलिटेक्निक सीसीसी केंद्रातील 5 अहवाल निगेटिव्ह आले. खाजगी लॅब येथील 17 अहवालांपैकी 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात बोराडी 1, महाराणा प्रताप कॉलनी 1, गल्ली नंबर 5 पारोळा रोड, धुळे 1, जे.बी .रोड 1, विशाल नगर मालेगाव रोड 1 व धमाणे (ता.धुळे) येथील एका रूग्णाचा समावेश आहे.

तसेच सायंकाळी 7:30 वाजता आलेल्या अहवानानुसार शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 31 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात 27 वर्षीय महिला मांडळ, 38 वर्षीय पुरूष करवंद. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 18 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात 25 वर्षीय पुरूष महादेवपुरा, 26 वर्षीय महिला महाराणा प्रताप चौक येथील आहे. तसेच भाडणे साक्री येथील सीसीसी के्रंदातील 52 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात कासारे 2, उंबर्टी 1,गजानन नगर साक्री 1, नयना सोसायटी साक्री 1, जिल्हा रुग्णालयातील 41 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुभाष नगरातील 31 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 54 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात यशोदा नगर 1, हिवखेड़ा 1, मोगलाई 1, नेर (ता. धुळे) 1 व साक्रीतील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याच एकुण रूग्ण संख्या 1 हजार 765 झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या