Sunday, September 22, 2024
Homeदेश विदेशIAF Planes Crash : एकाच दिवशी वायुसेनेच्या 2 विमानांचा अपघात

IAF Planes Crash : एकाच दिवशी वायुसेनेच्या 2 विमानांचा अपघात

दिल्ली | Delhi

- Advertisement -

राजस्थान आणि मध्य प्रदेशात भारतीय दलाच्या ( Indian Air Force) विमानांचे मोठे अपघात झाले आहेत. (Plane Crash) या अपघातात विमानांचा चक्काचूर झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एकाचवेळी ३ विमानांचा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील मुरैना भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई-२० (sukhoi 30) आणि मिराज २००० (mirage 2000) यांचा अपघात झाला. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशमधील ग्वालियर एअरबेसवरून उड्डण केले होते. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटना स्थळी दाखल झाले. (IAF Planes Crash)

अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. ही दोन्ही विमानांनी नियमीत अभ्यासासाठी उड्डाण केले होते.

तर दुसऱ्या घटनेत, राजस्थानमध्ये आज सकाळी भरतपूर येथील सेवर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक फायटर जेट विमान कोसळले. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर आग लागली.

स्फोट झाल्यामुळे विमानाचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने हे विमान गावातील एका शेतात कोसळले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या