Thursday, March 13, 2025
HomeराजकीयRaj Thackeray on Pakistani actor's film : …तर हे औदार्य महागात पडेल;...

Raj Thackeray on Pakistani actor’s film : …तर हे औदार्य महागात पडेल; ‘या’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरेंना थेट इशारा

मुंबई | Mumbai

मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

फवाद खान (Fawad Khan) नावाच्या पाकिस्तानी कलाकाराचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ (The Legend of Maula Jatt) नावाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा आता मनसेकडून देण्यात आला आहे. शिवाय पाकिस्तानी (Pakistan) कलाकारांचे सिनेमे भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.

हे हि वाचा : शरद पवार गटाचा श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार फायनल?

पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका,” अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.

हे हि वाचा : जिल्ह्यातील अजितदादांचा एक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर

“हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊल उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पाहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे,” अशी आशाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...