मुंबई ।
- Advertisement -
राज्य सरकारने गेल्या 50 वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला राज्याचा महसूल वाढवण्यासाठी नवीन मद्यविक्री परवाने देण्याची योजना असल्याची माहिती समोर आली आहे . विदेशी मद्यनिर्मिती परवाने देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
हे 328 नवे परवाने थेट दुकानांना नव्हे, तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. प्रत्येक कंपनीला 8 परवाने मिळणार असून, हे परवाने भाड्याने देण्याची परवानगीही असेल. या परवाना वितरणासाठी स्थापन होणाऱ्या समितीत अजित पवार यांचा समावेश आहे. मात्र, कॅपोव्हिटेज या मद्य निर्मिती कंपनीच्या संचालकपदी जय पवार असल्याने हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असा आरोप विरोधकांनी केला आहे.





