धुळे – प्रतिनिधी dhule
सांगली (sangli) जिल्ह्यातील बावची (ता.वाळवा) येथील शेतकर्यांची (farmer) तब्बल 33 लाख 53 हजार रुपयात फसवणूक (Fraud) करण्यात आली. ऊस तोडणीसाठी कामगार पाठविण्याचे सांगत शिरपूर तालुक्यातील तिघांनी हा प्रताप केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस (police) ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत केरु पवार (वय 50 रा.बावची ता.वाळवा जि.सांगली) यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दि.13 एप्रिल ते 3 ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडला. नटवाडे (ता.शिरपूर) व सुदर्शन लॉज, शिरपूर येथे भिमराव सुरसिंग दरेसिंग भिल, चंद्रसिंग दरेसिंग भिल दोघे (रा.नटवाडे ता.शिरपूर) व विजय छगन भिल (रा.वरझडी ता.शिरपूर) या तिघांनी राजाराम बापु सहकारी साखर कारखाना (साखराळे ता. वाळवा) येथे ऊस तोडणीसाठी कामगार पुरविण्यात येतील, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आरटीजीएस तसेच रोख व फोनपे द्वारे वेळोवेळी एकूण 33 लाख 53 हजार रुपये देण्यात आले.
मात्र, त्यांनी ठरल्याप्रमाणे कामगार न पुरविता फसवणूक केली. त्यानुसार वरील तिघांविरुध्द भादंवी कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एपीआय गणेश फड करीत आहेत.