Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे : जिल्ह्यात 35 पॉझिटिव्ह

धुळे : जिल्ह्यात 35 पॉझिटिव्ह

धुळे – Dhule

जिल्ह्यात आज रात्री नऊ वाजेपर्यंत 35 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरातील 15 रूग्णांचा समावेश आहे. तर मुकटी(ता. धुळे) येथील 65 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 1 हजार 486 झाली आहे. त्यापैकी तब्बल 913 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

- Advertisement -

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 37 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात अमळथे 1, शिंदखेडा 2, खलाणे 1, दोंडाईचातील 1 रूग्णाचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालयातील 26 अहवालांपैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात उडाने (ता. धुळे) 3 व धुळे शहरातील एक रूग्ण आहे. तसेच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 23 अहवालांपैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिरपूर शहर 3 व बाळदेतील एकाचा समावेश आहे.

तसेच खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त माहितीनुसार 63 अहवालांपैकी 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात धुळे शहरातील आग्रारोड 4, देवपुर भतवाल 2, मोगलाई 1, संभाप्पा कॉलनी 1, सोन्या मारुती कॉलनी सुरतवाला 1, तहसील कचेरीजवळ 1, रंगारंग कॉलनी 1 तसेच नरडाणा 3, मूकटी 1, मेहेरगाव 1, लळिंग (मोहाडी) 1 व शिरपुरातील एका रूग्णांचा समावेश आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातीलया 8 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच रात्री साडे आठ वाजता जिल्हा रूग्णालयातील 16 अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सुयोग नगर, देशमुखवाडा मोगलाई व रेल्वे स्टेशन जवळील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. तसेच दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयातील 2 अहवालांपैकी महाराणाप्रताप चौक, मालपूर येथील 1 पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 1 हजार 486 वर पोहाचली आहे. तर आतापर्यंत एकुण 73 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या