Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यातील ४५ हजार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ३८ कोटींची मदत

नंदुरबार जिल्ह्यातील ४५ हजार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ३८ कोटींची मदत

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

अतिवृष्टी, गारपीट व पुरामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानी पोटी कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यातील ४५ हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांना ३८ कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोंबर २०१९, जून ते ऑक्टोंबर २०२० आणि जून ते ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणेमार्फत करण्यात आले. या नुकसानीची भरपाई जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीने मिळावी याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. के.सी.पाडवी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत १२ हजार १५० शेतकर्‍यांना १६ कोटी ५२ लाख ३५ हजार ४०६ रुपयाची मदत देण्यात आली. यात नंदुरबार तालुक्यात ४ कोटी ६५८ लाख ८०३ (२७५४ शेतकरी),

नवापूर ५३ लाख ६८ हजार २९० (११३५ शेतकरी), शहादा ६ कोटी ९९ लाख ५२ हजार ५०० (३३६१ शेतकरी), तळोदा २ कोटी ८३ लाख ४१ हजार २४० (२६९९ शेतकरी), अक्कलकुवा ९६ लाख ३४ हजार ५७३ (११०० शेतकरी) आणि अक्राणी तालुक्यात ५४ लाख २८ हजार (११०१ शेतकरी) अशा एकूण १२ हजार १५० कोरडवाहू व बागातदार शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

जून ते ऑक्टोंबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत २४ हजार ८३९ शेतकर्‍यांना १५ कोटी ९७ लाख ३४ हजार ९१४ रुपयांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात ५९ लाख ४७ हजार ३२७ (९७४ शेतकरी),

नवापूर १ कोटी ५९ लाख ७१ हजार २०० (४८४२ शेतकरी), शहादा १ कोटी ३८ लाख ९७ हजार ७८७ (१९९२ शेतकरी), तळोदा ८८ लाख ५३ हजार ३५० (१४८९ शेतकरी), अक्कलकुवा २ कोटी ६५ लाख ५३ हजार ४०० (२८३८ शेतकरी) आणि अक्राणी तालुक्यात ८ कोटी ८५ लाख ११ हजार ८५० (१२७०४ शेतकरी) अशा एकूण २४ हजार ८३९ कोरडवाहू व बागातदार शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

७ ते २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबाबत पहिला हप्त्याची रक्कम ५ कोटी ५८ लाख १० हजार निधीपैकी नंदुरबार तालुक्यात १ कोटी ५० लाख ८१ हजार ८१७ ( ३३३४ शेतकरी),

नवापूर ३३ हजार ६०९ (१३ शेतकरी ), शहादा ३ कोटी २२ लाख ७ हजार १७५ हजार (३९१३ शेतकरी ), तळोदा १ लाख ५४ हजार ५०० (२९ शेतकरी), अक्कलकुवा ५ लाख ६२ हजार ४४५ (२९४ शेतकरी) आणि अक्राणी तालुक्यात ४९ लाख ४३ हजार १०० (९२० शेतकरी) अशा एकूण ८ हजार ५०३ कोरडवाहू व बागातदार शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधुन कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये असे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाकडून प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुकास्तरावर नियेाजन करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या