Monday, June 17, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकसाठी ३९.४१ तर दिंडोरी लोकसभेसाठी...

Loksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकसाठी ३९.४१ तर दिंडोरी लोकसभेसाठी ४५.९५ टक्के मतदान

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशात आज लोकसभेच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात आठ राज्यांमधील ९४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी (Nashik and Dindori) या दोन मतदारसंघासाठी देखील मतदान होत आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान (Voting) केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी दर तासाला वाढताना दिसत आहे.

हे देखील वाचा : Nashik-Dindori Constituency 2024 : उमेदवारांसह आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत अनुक्रमे ६.४५ आणि ६.४० टक्के मतदान झाले होते. तर अकरा वाजेपर्यंत हीच आकडेवारी वाढून अनुक्रमे १६.३० आणि १९.५० टक्के इतकी झाली होती. तर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी २८.५१ आणि दिंडोरीसाठी ३३.२५ टक्के इतके मतदान झाले होते. यानंतर आता दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ३९.४१ टक्के तर दिंडोरीसाठी ४५.९५ टक्के मतदान झाले असून या दोन्ही मतदारसंघांची विधानसभानिहाय टक्केवारी देखील समोर आली आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये १६.३० तर दिंडोरीत १९.५० टक्के मतदान

त्यानुसार नाशिक मध्य मतदारसंघात ४०.२१ टक्के, देवळाली मतदारसंघात ४०.२० टक्के, नाशिक पश्चिममध्ये ३२.२८ टक्के, नाशिक पूर्वमध्ये ३८.१२ टक्के इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये ४४.७७ टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये ४५.३० टक्के इतके मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे सिन्नर मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान नाशिक पश्चिम मतदारसंघात झाले आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केले मतदान

तर दिंडोरीतील विधानसभानिहाय टक्केवारीचा विचार केल्यास दुपारी तीन वाजेपर्यंत नांदगावमध्ये ४१.४८ टक्के, येवल्यात ४०.६७ टक्के, कळवण मतदारसंघात ५३.८४ टक्के, चांदवड मतदारसंघात ४७.५७ टक्के, निफाडमध्ये ४४.६७ टक्के आणि दिंडोरी मतदार संघामध्ये ४८.०२ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे कळवणमध्ये तर सर्वात कमी येवल्यात मतदान झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात उरलेल्या काही तासांत मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : लोकसभा निवडणूक २०२४ : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

धुळे लोकसभा मतदानाची टक्केवारी

तसेच धुळे लोकसभेसाठी (Dhule Loksabha) देखील आज मतदान होत असून या मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ३९.९७ टक्के मतदान झाले आहे. यात विधानसभानिहाय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास धुळे ग्रामीण ४२.३४ टक्के, धुळे शहर ३८.४१ टक्के, शिंदखेडा ३९.५५ टक्के, मालेगाव मध्य ४३.६८ टक्के, मालेगाव बाह्य ३८ टक्के आणि बागलाणमध्ये ३७.६९ टक्के इतके मतदान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या