Monday, May 20, 2024
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात ४ शेळ्यांचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात ४ शेळ्यांचा मृत्यू

हनुमंतगाव | वार्ताहर

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील भगवान गंगाधर प्रधान यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्या. भगवान प्रधान यांचे हनुमंतगाव येथे गावाचे मध्यभागी घर असुन घरासमोर असलेल्या गोठ्यात घुसून बिबट्याने रात्री २ ते ३ च्या दरम्यान चार शेळ्यांचा फडशा पाडला. सदर घटनेची माहिती तात्काळ वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली.

- Advertisement -

सदर घटनेचा वनअधिकारी गजेवार यांनी मालक भगवान प्रधान तसेच गावातील नागरीक अशोक फणसे, दिनकर राहिऺज, अरुन प्रधान, पञकार सऺदिप गावडे, नितीन पिऺपळे, भाऊसाहेब बर्डे यांच्या समक्ष पऺचनामा केला. बिबट्याने हल्ला करत चार शेळ्या ठार केल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह  ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान हनुमंतगाव परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. बिबटे गावात घुसून शेतकऱ्यांच्या पशुधनावर करत असलेल्या हल्ल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ल्याच्या घटना या नेहमीच्या झाल्या असून कुत्रे, मोर, कोल्हे, ससे हे प्राणी नामशेष होत चालले आहे. बिबटे गावात यायला लागल्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरे लावुन हे बिबटे जेरबंद करत नागरिकांची दहशतीतून मुक्तता करावी अशी मागणी ग्रास्थांनी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या