जळगाव – jalgaon
जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पुर येण्याची शक्यता आहे. नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी नदी, नाले, ओढा काठी जाऊ नये.
रावेर तालुक्यात पावसाचे थैमान ; अनेक गावांमध्ये शिरले पाणीखिरोदा : नदीला महापूर ; जनजीवन विस्कळीतचिनावल परिसरात अतिवृष्टी ; जनजीवन विस्कळीत
हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ
हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दि.१९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात येवून ३८८२.०० क्युमेक्स (१३७०९३ क्यूसेक) विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
हतनूर धरणातील विसर्गामुळे तापी नदीकाठच्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावातील शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणाधिकारी यांनी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावयाच्या आहेत. अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी दिल्या आहेत.