धुळे –
जिल्ह्यात काल तब्बल 62 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आजही 44 रूग्ण आढळून आले. त्यात धुळे 14, शिरपूर 28, साक्रीतील 2 व जिल्ह्यातील 3 रूग्ण नाशिक येथे खाजगी रूग्णालयात दाखल आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 610 वर पोहोचली आहे.
जिल्हा रुग्णालयातील 20 अहवालांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात गोंदूर रोड परिसरातील 3 जण 75 वर्षीय महिला,43 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरूण, बापू भंडारी गल्लीतील 4 जण 68 वर्षीय पुरूष, 54 वर्षीय महिला, 30 वर्षीय तरूण, 30 वर्षीय तरूण, मोगलाईत 30 वर्षीय तरूण, शिवपार्वती कॉलनी दत्तमंदिर 26 वर्षीय तरूण, मोहमद्दी नगर 32 वर्षीय तरूण, एसीपीएम कॉलेजमधील 39 वर्षीय महिलेचा व इतर भागातील तीन रूग्णांचा समावेश आहे. व शहरातील 1 रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह आला आहेत. तसेच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 29 अहवालांपैकी 19 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ओतार गल्ली 4 जण 78 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय पुरूष, 37 वर्षीय महिला, 58 वर्षीय महिला, पाटील वाड्यातील 4 जण 65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरूष, 31 वर्षीय पुरूष, 8 वर्षीय बालिका, बौद्ध वाड्यातील 4 जण वर्षीय बालिका, 25 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरूण, 8 वर्षीय बालक, माळी गल्लीतील 70 वर्षीय पुरूष व 40 वर्षीय महिला, दादा गणपती चौकातील एक 45 वर्षीय महिला, कुंभार टेक एक 32 वर्षीय पुरूष, जैन गल्लीतील एक 32 वर्षीय पुरूष, वड गल्लीतील 58 वर्षीय पुरूष, आंबेडकर चौकातील 17 वर्षीय युवक व शहरातील इतर 7 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 3 रुग्ण नाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तसेच साक्रीतील 3 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 610 झाली आहे.
जिल्ह्यात दररोज रूग्ण संख्या वाढत असली तरी रूग्ण बरे होणार्यांची संख्या देखील वाढत आहे. आज जिल्हा रूग्णालयातून 14 रूग्ण कोरोना मुक्त झाले. त्यात धुळे शहर 13 व साक्रीतील 1 एकाचा समावेश आहे. त्यांना टाळ्याच्या गजरात निरोप देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकुण 339 रूग्णांची कोरोनावर मात केली आहे.