Wednesday, April 2, 2025
Homeनगरकुणबी समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्ने करावीत

कुणबी समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्ने करावीत

महासंघाचे अध्यक्ष पटेल : शिर्डीत मराठा कुणबी समाजाचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – मराठा कुणबी समाजाची आर्थिक स्थिती दयनीय होण्याचे एकमेव कारण म्हणजे समाजात होणारे विवाहसोहळे. कर्ज काढून मोठ्या थाटामाटात विवाह केले जातात. अशी हुंडा प्रथा मोडीत काढून सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्ने करावीत, असे आवाहन मराठा महासंघाचे अध्यक्ष एल. पी. पटेल यांनी शिर्डीत केले.
शिर्डी शहरात काल शनिवारी अखिल भारतीय कुणबी समाजाच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनास सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे महासंघाचे महासचिव डॉ. व्ही. एस निरंजन, ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर, जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, पैलवान शिवाजीराजे आदींसह स्थानिक पदाधिकारी व देशातील कुणबी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात देशातील विविध भाषांतील कुर्मी क्षत्रिय समाजाचे 25 राज्यांतील सुमारे चार हजाराहून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पटेल यांचा शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर व जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, राज्यात या योजनांचे मूळ कारण म्हणजे 10 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अधिवेशन झाले त्यावेळी असे समजले की सरदार पटेल समुदाय हा क्षत्रिय आहे, कुणबी आहे. महाराष्ट्र राज्यात समाजाची सर्वात जास्त संख्या आहे. कुणबी समाज शेतकरी असून एवढा मोठा समाज देशात असताना मात्र शेतकरी बेहाल असल्याचे त्यांनी सांगितले. 1988 नंतर पहिल्यांदाच सर्वजण एकत्र आल्याचे त्यांनी सांगून भारतीय सैन्यात शेतकर्‍यांची मुले असतात, राज्यातील आपल्या समाजाचे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिर्डीतून सबका मालिक एकचा मंत्र आपण सर्व घेणार आहोत. सरदार पटेल होते म्हणून देश एकत्र झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे देशाला एकत्र ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाजाच्या उन्नतीसाठी शिर्डी डिक्लेरेशन करणार आहे. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाने एक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय कुणबी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पटेल म्हणाले की, एकट्या महाराष्ट्रात कुणबी समाजाची एकूण लोकसंख्या सात कोटी 20 लाख आहे. म्हणजे देशाच्या 25 टक्के एवढी लोकसंख्या महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी सांगत समाजातील सर्वांना एका छत्राखाली आणणार आहे. या महाअधिवेेशनासाठी देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू ,केरळ, आसाम, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, झारखंड, बिहार आदी राज्यांतून मोठ्या संख्येने समाजाचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक सहभाग महिलांचा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात कुर्मी क्षत्रिय मराठा समाजाची संख्या 22 टक्के असल्याचे त्यांनी यावेळी आठवण करून दिली. अखिल भारतीय कुणबी समाज चार सत्रात संघटन करत आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात रोटी एकता असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजाची आर्थिक स्थिती दयनीय याचे एकमेव कारण म्हणजे समाजात होणारे विवाह सोहळ्यासाठी साठ टक्के लोक कर्ज काढून विवाह करतात, त्यामुळे कर्जात बुडत असून हुंडा प्रथा मोडीत काढावी आणि विवाह सोहळे सामुदायिक रितीने करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवेशन यशस्वी होण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयकुमार ठुबे, डॉ. मंगेश देशमुख, क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एस. एल. तांबे, नितीन देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे विजयराव काकडे, माधवराव देशमुख, व्यंकटराव शिंदे, धनंजय जोगदंड, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले पै. रवींद्र वाघ, पै. मदन मोकाटे, संतोष भोकरे, संतोष घोलप, अशोक काजळे, मच्छिंद्र वदक, अविनाश शिंदे, संकेत गव्हाणे आदी समाजबांधव प्रयत्नशील आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....