नवी दिल्ली | New Delhi
– राज्यसभेच्या नवनिर्वाचित 45 खासदारांचा बुधवारी शपथविधी पार पडला. 45 newly elected Rajya Sabha members take oath माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मागील लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे दिग्विजयिंसह, काँग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपाचे भूवनेश्वर कलिता यांच्यासह राज्यसभेच्या नवनिर्वाचित 45 सदस्यांनी बुधवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, यातील 36 सदस्य पहिल्यांदाच राज्यसभेत आले.
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी Rajya Sabha Chairman Venkaiah Naidu राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. करोनाच्या साथीमुळे भौतिक दूरतेच्या नियमांचे पालन करत हा शपथविधी समारंभ झाला. राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत 61 सदस्य विजयी झाले आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, शरद पवार, रामदास आठवले, दिग्विजयिंसह, प्रेमचंद गुप्ता आणि भूवनेश्वर कलिता यांच्यासह 12 सदस्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे नेते थावरचंद गहलोत, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते.
पक्षाचे राजीव सातव, भाजपाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या प्रियांका विक्रम चतुर्वेदी अशा महाराष्ट्रातील एकूण 6 सदस्यांनी सदस्य पदाची शपथ घेतली. पवार आणि आठवले यांनी दुसर्यांदा सदस्य पदाची शपथ घेतली.
ज्योतिरादित्य मुख्य आकर्षण
बुधवारच्या शपथविधी समारंभाचे मुख्य आकर्षण ज्योतिरादित्य शिंदे होते. मध्यप्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे सरकार पाडून राज्यात भाजपाचे सरकार आणण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती. मध्यप्रदेशच्या राजकारणात मुख्य प्रतिस्पर्धी राहिलेले दिग्विजयिंसह यांना शिंदे यांनी हात जोडून अभिवादन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद तसेच मल्लिकार्जुन खर्गे यांनाही शिंदे यांनी नमस्कार केला.