Sunday, November 24, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! जितिया व्रताच्या आंघोळीदरम्यान मोठी दुर्घटना; तब्बल ४९ जण बुडाले

धक्कादायक! जितिया व्रताच्या आंघोळीदरम्यान मोठी दुर्घटना; तब्बल ४९ जण बुडाले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहारमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवारी बिहारच्या गंगासह वेगवेगळ्या नद्यांमध्ये तब्बल ४९ जण बुडाल्याची घटना घडली आहे, त्यातील ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी जितिया व्रत उत्साहात साजरे करण्यात आले. बिहारमध्ये महिलांनी गंगासह वेगवेगळा नद्यांमध्ये आंघोळ केली, मात्र याचदरम्यान बिहार ही मोठी दुर्घटना घडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी तलावात आंघोळ करताना दोन महिला आणि सहा मुलींसह आठ जणांचा मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील बरुण ब्लॉकच्या इथाट गावात आणि मदनपूर ब्लॉकच्या कुशा गावात घडली. दुसरीकडे कैमूरमध्ये देखील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेले सर्व जण पुजेपूर्वी तलावात अंघोळीसाठी उतरले होते.

- Advertisement -

जितिया सणाच्या पूजेपूर्वी तलावात आंघोळीसाठी गेलेल्या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सारण जिल्ह्यातही आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह आंघोळीसाठी गेलेल्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटना वेगवेगळ्या भागातील आहेत. जिल्ह्यातील रामगड पोलीस स्टेशन परिसरात एक घटना घडली. दुसरी घटना दुर्गावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपूर गावातील, तिसरी घटना मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादर गावातील आहे. चौथी घटना भभुआ ब्लॉकच्या रूपपूर गावातील आहे.

रोहतास जिल्ह्यातील देहरी पाली पुलाजवळ सोन नदीत आंघोळ करताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मोतिहारी जिल्ह्यातील कल्याणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वृंदावन परसौनी येथे एका आई आणि मुलीसह इतर दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. तर अन्य एका ठिकाणी बुडत असलेल्या एका चिमुकलीला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तिघांचा चिमुकलीसह बुडून मृत्यू झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या