Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशबस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बिल्लावर भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. कठुआच्या बिल्लावर भागात बसला भीषण अपघात झाला आहे.

- Advertisement -

या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इतर तब्बल १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौगहून डन्नू पॅरोलला घेऊन जाणारे वाहन सिला येथे खाली आल्यानंतर खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात सुरुवातीला चार जण ठार झाले तर पाचव्या व्यक्तीचा काही काळानंतर मृत्यू झाला. दरम्यान १५ जखमींना बिल्लावर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये ३९ ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली होती. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते.

प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराच्या घराबाहेरच…

अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला होता. या अपघातात १६ जवानांचा मृत्यू झाला होता. बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली होती.

अत्याचार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्यासुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

- Advertisment -

ताज्या बातम्या