Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशनेपाळमध्ये पुन्हा मोठा अपघात; हेलिकॉप्टर कोसळलं, ५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये पुन्हा मोठा अपघात; हेलिकॉप्टर कोसळलं, ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये विमान अपघाताचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नसून पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अपघात घडला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिभुवन विमानतळावर एका विमानाचा अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना घडून काही दिवस होत नाही तोच आता पुन्हा एकदा हा अपघात झाला आहे. नेपाळच्या नुवाकोट भागात झाला आहे. एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर अचानक कोसळले आणि हेलिकॉप्टरमध्ये आग लागली, त्यामुळे आतमध्ये बसलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नुवाकोटमधल्या शिवपुरीमध्ये हा भीषण अपघात झाला. हेलिकॉप्टरने रसुवासाठी टेक ऑफ केले होते. या हेलिकॉप्टरमध्ये ४ चीनी नागरिकांसह ५ जण होते. कॅप्टन अरुण मल्ला हेलिकॉप्टरमध्ये पायलट होते. टीआयएहून टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांमध्ये अचानक हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, यानंतर काही वेळात हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले.

- Advertisement -

अपघात झालेल्या ठिकाणी सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे. खराब व्यवस्थापनामुळे नेपाळमध्ये विमान अपघात होत असल्याचं सांगितले जात आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीच्या 9N-AZD हेलिकॉप्टरने काठमांडू येथून दुपारी 1:54 वाजता स्याप्रुबेसी, रसुवा येथे उड्डाण केले. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टर उडवत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या