Saturday, May 25, 2024
Homeनाशिकजुलैच्या ११ दिवसात ५ हजारावर करोना संशयित

जुलैच्या ११ दिवसात ५ हजारावर करोना संशयित

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शहरात जुलै महिन्याच्या ११ दिवसात शहरातील रुग्णालयात ४ हजार ८११ संशयित रुग्ण दाखल झाले असुन या करोना बाधीतांच्या संपर्कातील संशयितांतून नवीन १८४९ बाधीत आढळून आले आहे. या करोनाच्या साखळीत बाधीत असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र परिवार यांनाच मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. शहरात गेल्या दहा दिवसात प्रति दिन ४०० च्यावर संशयित आढळत असल्याने आता करोना संशयितांनी आपला आजार न लपविता तत्काळ रुग्णालयात दाखल झाल्यास करोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार आहे.

- Advertisement -

मास्क न लावल्याने, सामाजिक अंतर न पाळल्याने आणि सॅनिटाईजरचा वापर न केल्यामुळे करोनाचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याचे डॉक्टरांच्या पाहणीत आढळून आलेले आहे. तसेच करोना संसर्ग झाल्यानंतर अनेक जण आपला आजार अंगावर काढत असुन त्यांचा संसर्ग त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना होत असल्याचा प्रकार जुने नाशिक व पंंचवटी भागातून समोर आले आहे. दररोज वाढत असलेल्या संशयितांच्या नमुन्यातून पॉझिटीव्हचा आकडा दिवसेदिवस वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात जुलै महिन्यात वाढत असलेल्या करोना संक्रमणाचा वेग पाहता शासकिय यंत्रणा चिंतेत पडली आहे. मागील महिन्यात शहरातील करोना बाधीतांचा आकडा हा जुलै महिन्यात ४ हजारपर्यत पोहचला जाईल असे प्रशासनाकडुन सांगण्यात आले होते. आता मात्र रुग्ण वाढीचा वेग पाहता १५ – १६ जुलैपर्यतच ४ हजार रुग्णांचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे.

शहरात करोना बाधीतांचे प्रतिदिन वेग हा जुन महिन्यात १५० पर्यत होता. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यापासुन १५० ते १७५ पर्यत होता. आता तो थेट १८० ते १८५ पर्यत गेला आहे. १ ते ११ जुलै या कालावधीत २३०, ८५, १८९, १९८, २०५, ८९, १८३, २२१, ११७, १६७ व १६५ अशाप्रकारे नवीन रुग्ण वाढल्यामुळे त्यांच्या संपर्कातील संशयित मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बाधीतांच्या कुटुबांतील व जवळचे नातेवाईक व मित्र या अतिजोखमीच्या व्यक्तींचा समावेश आहे.

ज्या प्रमाणात संख्येने बाधीतांचा आकडा समोर येत आहे, त्या प्रमाणे एका बाधीतांच्या घरातील व जवळचे साधारण 8 व्यक्ती अशाप्रमाणात संशयित दररोज रुग्णालयात दाखल होत आहे. एकुणच आता एका व्यक्तीच्या संपर्कातून अनेक आणि अनेकांच्या संपर्कामुळे बाधीतांचा आकडा दररोज दीडशे ते दोनशे आसपास पोहचला आहे.

करोना संसर्ग वाढण्यास भाजी भाजार, बाजार पेठेत गर्दी, सामाजिक अंतर न पाळणे, मास्कचा व्यवस्थीत वापर न करणे, सॅनिटाईजरचा वापर न करणे या बाबी कारणीभूत ठरत आहे. अशाप्रकारे शहराला करोनाचा विळखा घट्ट करण्यास नाशिककरच कारणीभूत ठरत असल्याने आता नाशिककरांनी सामाजिक अंतर, मास्कचा वापर, गर्दीच न जाणे व सॅनिटाईजरचा वापर करण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या सुुचनांचे पालन करुन आपली जबाबदार पार पाडली पाहिजेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या