Sunday, September 29, 2024
Homeजळगावराज्यात चोपडा बसस्थानकाने मारली बाजी ; स्वच्छ, सुंदर अभियानात 50 लाखांचे प्रथम...

राज्यात चोपडा बसस्थानकाने मारली बाजी ; स्वच्छ, सुंदर अभियानात 50 लाखांचे प्रथम बक्षीस

मुंबई / चोपडा । प्रतिनिधी
एसटी महामंडळाने घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यामधील चोपडा बसस्थानकाने बाजी मारली आहे. चोपडा बसस्थानकाने पहिले बक्षिस पटकावले आहे. त्यासाठी बसस्थानकाला 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तर ब वर्गामध्ये भंडार्‍यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आल्याने 25 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

तसंच क वर्गातून सातार्‍यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आलाय. त्यामुळे 10 लाखाचे बक्षीस मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 1 मे 2023 ते 30 एप्रिल, 2024 या कालावधीत राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविले गेले.

- Advertisement -

लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, तयार करण्यात आले. प्रवाशांना मिळणार्‍या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छतेबरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले.

हे ही वाचा : मोटरसायकलच्या धडकेत बालकाचा मृत्यू

या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा राज्यभरातील 563 बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्याचे ठरले होते. येत्या 15 ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा उल्लेख करुन प्रमुखांचा सत्कार करण्यात येणार आहे.

चोपड्यात फटाके फोडून आनंद साजरा
राज्यस्तरीय 50 लाखाचे बक्षीस तर नाशिक प्रादेशिक विभागात 10 लाखाचे बक्षीस मिळाल्याबद्दल बुधवारी संध्याकाळी 6 वाजता चोपडा बसस्थानकाच्या आवारात आगार प्रमुख महेंद्र पाटील व एसटी कर्मचार्‍यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी शेकडो प्रवाशी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या