Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 : गुजरात टायटन्स संघासमोर पंजाब किंग्जचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

IPL 2025 : गुजरात टायटन्स संघासमोर पंजाब किंग्जचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२५ (IPL 2025) मध्ये आज (मंगळवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Punjab Kings and Gujarat Titans) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जियो हाॅटस्टारवर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असणार आहे. तर शुभमन गिलकडे (Shubman Gill) गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास गुजरात टायटन्सने ३ तर पंजाब किंग्ज ने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.आयपीएल २०२५ ची विजयी सुरुवात करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स मैदानावर उतरणार आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्स संघाच्या फलंदाजीची मदार शुभमन गिल, साई सुदर्शन, जाॅस बटलर, अनुज रावत यांच्यावर असणार आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये राहुल टेवाटिया, रशीद खान,निशांत सिंधू, शाहरुख खान,जयंत यादव हे पर्याय उपलब्ध आहेत. गोलंदाजीत रशीद खान, इशांत शर्मा, कगिसो रबाडा, गेराल्ड कोएटझी, प्रसिध्द कृष्णा हे पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजीची मदार श्रेयस अय्यर, प्याला अविनाश, नेहाल वढेरा, श्रेयस अय्यर यांच्यावर असणार आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये मार्कस स्ट्राॅईनीस, मुशीर खान, प्रवीण दुबे, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यानसेन हे पर्याय उपलब्ध आहेत. गोलंदाजीत अर्शदिपसिंग हरप्रीत ब्रार, लाॅकी फर्गसन, कुलदीप सेन,यश ठाकूर आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या