नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सध्या घराघरात मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील रुग्णांकडे या औषधी असतात. आता देशाच्या भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) विविध औषधांसंदर्भात धक्कादायक अहवाल दिला आहे. यामध्ये अनेक औषधी गुणवत्ता चाचणीत फेल ठरल्या आहेत. भारतच्या औषध नियमक संस्थेने ५३ औषधांची यादी जाहिर केली आहे. जी दर्जा तपासणीत अपयशी ठरली आहे. यात प्रतिजैविके, पॅरासिटामॉल, मधुमेहासह रक्तदाबावरीलही औषधे आहेत.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने जाहीर केलेल्या यादीत कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 सप्लीमेंट , मधुमेहाच्या गोळ्या व रक्तदाबाच्या औषधांचाही समावेश आहे. गुणवत्ता परीक्षणात फेल झालेल्या औषधांची यादी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) त्यांच्या ऑफिशिअल वेबसाइटवर अपलोड केली आहे.
सीडीएससीओने क्वालिटी चेकमध्ये फेल ठरलेल्या औषधांमध्ये पॅन्टोसिड गोळ्यांचाही समावेश आहे. हे औषध ऍसिड रिफ्लेक्सवर उपचार करण्यासाठी प्रभावी मानले जाते. हे औषध सन फार्मा कंपनीने बनवले आहे. याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्याही क्वालिटी चेकमध्ये अपयशी ठरल्याचे दिसून आले.
कोणती औषधं गुणवत्ता चाचणीत अपयशी?
पॅरासिटामॉल (500 मिग्रॅम): सौम्य ताप आणि वेदनाशामक म्हणून पॅरासिटामॉल या औषधाचा वापर केला जातो. सामान्यतः प्रत्येक घरात या औषधी आढळतात.
ग्लिमेपिराइड: मधुमेहासाठी वापरण्यात येणारे हे औषध आहे. मधुमेह म्हणजे शुगर असणारे रुग्ण नियमित ग्लिमेपिराइड वापरतात. हे अल्केम हेल्थने तयार केले होते.
Telma H (Telmisartan 40 mg): ग्लेनमार्कचे हे औषध उच्च रक्तदाब म्हणजे ब्लडप्रेशरच्या उपचारासाठी दिले जाते. हे औषध चाचणीत गुणवत्ता पार करु शकले नाही.
पॅन डी: अॅसिडीसाठी हे औषध वापरले जाते. हे औषध देखील गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरले. हे अल्केम हेल्थ सायन्सने केले आहे.
Shelcal C आणि D3 कॅल्शियम पूरक: Pure & Cure Healthcare द्वारे उत्पादित आणि Torrent Pharmaceuticals द्वारे वितरीत केलेले Shelcal, चाचणीमध्ये मानकांची पूर्तता करत नाहीत.
Clavam 625: हे एक प्रतिजैविक औषध आहे.
Sepodem XP 50 Dry Suspension: लहान मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या बॅक्टीरियावर उपचार म्हणून या औषधाचा वापर केला जातो. हैदराबादमधील हेटेरो कंपनीने हे औषध बनवले आहे. ते गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले.
Pulmosil (इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी): सन फार्माद्वारे बनवलेले हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणून वापरले जाते.
पॅन्टोसिड (ऍसिड रिफ्लक्ससाठी): ऍसिडिटी आणि रिफ्लक्सच्या उपचारांसाठी वापरले जाणारे सन फार्माचे हे औषध देखील गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरले.
Ursocol 300: सन फार्माचे हे औषधही गुणवत्तेचे निकष पूर्ण करत नाही.
Defcort 6: संधिवात उपचारात दिले जाणारे मॅक्लिओड्स फार्माचे हे औषध गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले.
ऑगस्ट महिन्यातही, सीडीएससीओने १५६ पेक्षा जास्त फिक्स्ड-डोज ड्रग कॉम्बिनेशन्स धोकादायक मानून त्यावर बंदी घातली होती. या औषधांमध्ये ताप, वेदना कमी करणाऱ्या आणि अॅलर्जीच्या गोळ्यांचा समावेश होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा