Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIND vs ENG पाचवा कसोटी सामना रद्द, पण मालिकेचा निर्णय कोणाकडे?

IND vs ENG पाचवा कसोटी सामना रद्द, पण मालिकेचा निर्णय कोणाकडे?

नवी दिल्ली

कोरोना संसर्गाच्या भीतीने टीम इंडिया (team india) आणि इंग्लड (england)दरम्यान होणारी पाचवी कसोटी (test match)रद्द करण्याचा निर्णय BCCIच्या संमतीने घेतल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे शेवटचा रद्द झालेला सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केल्यास ही मालिका बरोबरीत २-२ अशी सुटणार आहे. यामुळे या सामन्यासंदर्भात ECB काय निर्णय घेणार यावरच सर्व अवलंबून आहे.

- Advertisement -

४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

ECB ने यापुर्वी काढलेल्या निवेदनात म्हटले होते की, टीम मैदानात न उतरवल्यामुळे भारताने हा सामना गमवला आहे. त्यानंतर काही वेळाने हे वाक्य काढून टाकले. यामुळे सामन्या बाबत संस्पेस निर्माण झाला आहे.

असा असेल फार्म्यूला

“भारतीय चमूतील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. पण हा कसोटी सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या सोयीनुसार पुनर्नियोजित करावा अशी विनंती आम्ही ECB ला केली आहे. BCCI आणि ECB यांच्यातील व्यावहारिक संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे ही विनंती करण्यात आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खेळण्याचा योग्य कालावधी कोणता असावा, याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षितता याला BCCI ने कायमच प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे सामन्याबाबत निर्णय घेण्यात आला”, असे BCCIच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ICCने घेतला हा निर्णय

ICC ने कसोटी चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये काहीच बदल केला नाही. म्हणजेच ICC ने पाचव्या कसोटी सामन्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय घेतला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या