धुळे dhule । प्रतिनिधी
शिरपूरातील क्रांती नगरातून दुचाकीसह (bike) दोन चोरट्यांना (Two thieves) शहर पोलिसांच्या (city police) डी.बी.पथकाने (caught) पकडले. त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या 6 दुचाकी हस्तगत (Stolen bike seized) करण्यात आल्या. तसेच दोन गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शिरपूर शहरातील आदर्श नगरातील हेमंत अनिल भोई (वय 29) या नाश्ता दुकानदाराची दुचाकी (क्र. एम.एच.18/बी.एस.1130) शहरातील खंडेराव महाराज मंदिराचे समोरील रस्त्यावरून चोरट्याने लंपास केली होती. दि.20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेदहा वाजेदरम्यान ही चोरीची घटना घडली.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने क्रांती नगरात दुचाकीवर संशयीतरित्या फिरणार्या दोघांना पकडले. संतोष विठ्ठल हटकर (वय 33 रा. क्रांती नगर, शिरपूर) व रितेश सुरेशसिंग जमादार (वय 37 रा. सातपुर, नाशिक ह.मु.क्रांती नगर, शिरपूर) अशी दोघांनी त्यांची नावे सांगितली. चौकशीत त्यांनी त्यांच्याजवळील दुचाकी ही खंडेराव महाराज मंदिराजवळुन चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच त्यांनी आणखी इतर ठिकाणी चोरी केलेल्या एकुण पाच दुचाकी संतोष विठ्ठल हटकर याचे घराजवळ लावलेल्या मिळून आल्या. त्यांच्याकडुन 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या एकुण 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या. गुन्ह्यात जप्त इतर दुचाकींबाबत गुन्हे दाखल आहेत किंवा कसे, या अनुषंगाने तपास सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास डी. बी. पथकाचे पोहेकॉ लादुराम चौधरी हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपविभागीय पोलिस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, डी. बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, पोकॉ विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, प्रविण गोसावी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार व राम भिल यांच्या पथकाने केली.