Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

Nashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

नाशिकरोडसह अन्य भागातील ६३ जणांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रेल्वे मंत्रालयासह (Railway) विविध आस्थापनांत केंद्र सरकारची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आंतरराज्य टोळीने तब्बल ६२ जणांकडून सहा कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील एका जीम ट्रेनरच्या पत्नीस तब्बल ११ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार, उपनगर पोलिसात (Upnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Fraud News : मनी लाँन्ड्रिंगच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तिस लाखोंचा गंडा

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, रमण सिंग उर्फ विशाल सिंग (रा. कोलकत्ता), निरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतुराज पाटील उर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. सांगली), राजेश सिंग (रा. कोलकत्ता), अंशुमन प्रसाद (रा रांची, झारखंड), संदीप सिंग (रा रांची), जैन अली (रा. वाशी, नवी मुंबई) असे संशयितांची नावे आहेत. तर विरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडेमळा, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, वाबळे यांचे शैलेंद्र महिरे यांच्याशी ओळख होती. संशयित रमन सिंग याने त्यांच्या मुलास रेल्वेमध्ये नोकरीला (Jobs) लावून दिले होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘आयटीआय’ मध्ये १९ लाखांचा घोटाळा

त्यामुळे संशयित रमणसिंग याने वाबळे यांच्या पत्नीलाही रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. वाबळे यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. त्यासाठी संशयित रमणसिंग याने त्यांच्याकडून ८ लाख रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी वाबळे यांना प्रशिक्षणासाठी कोलकत्ता येथे बोलावून घेतले. खोटे नियुक्तीपत्रासह कोलकत्त्यात एका ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमले. त्यानंतर महाराष्ट्रात बदली करण्यासाठी पुन्हा वाबळे यांच्याकडून पैसे घेतले. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत त्यांची तब्बल ११ लाखांची फसवणूक झाली होती. अशाच रितीने संशयितांच्या टोळीने ६२ जणांची फसवणूक केली असून, सुमारे ६ कोटी २ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे

हा प्रकार डिसेंबर २०२२ ते जून २०२४ या दरम्यान घडला आहे. संशयितांनी फिर्यादी वाबळे यांना विश्वासात घेऊन त्यांच्या पत्नीच्या नावे रेल्वेचे बनावट लेटरहेड, कागदपत्रे, शिक्के मारून सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून कोलकत्ता येथे नेमणूक केली. त्यानंतर महाराष्ट्रात बदली करण्यासाठी पुन्हा पैसे उकळले. अशाप्रकारे फसवणूक करणारी ही मोठी साखळी असून, ६ कोटींची फसवणूक उघडकीस आली आहे. सदरचा गुन्हा तपासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक किशोर कोल्हे हे करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...