नाशिक | प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी सोमबार (दि. १६ नोव्हेंबर) पासून प. सा. नाट्यगृहात सुरू होत आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग होणार असून, नाशिककरांना २३ नाट्यप्रयोगांचा आनंद घेता येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार ही स्पर्धा होत आहे. नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत नाशिकसह धुळे, इंदूर आदी भागांतील २३ नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक आणि समकालीन विषयांवरील नाटके सादर केली जाणार आहेत.
त्यामुळे नाट्यरसिकांना विविध नाट्यशैली, कथावस्तू आणि कलाकारांची सर्जनशीलता अनुभवण्याची संधी मिळणार आहे, २३ नाट्यसंस्थांच्या कलात्मक अभिव्यक्तीचा अनुभव नाशिककरांना घेता येणार असल्याची माहिती स्पर्धा समन्वयक राजेश जाधव यांनी दिली.
महाबळेश्वरला मागे टाकत ‘या’ जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; राज्यात थंडीचा जोर वाढणार
नाट्यरसिकांसाठी पर्वणी
यंदाच्या स्पर्धेत विविध विषय आणि घेगवेगळ्या कथावस्तूंवर आधारित नाटके सादर होणार आहेत. २३ नाट्यसंस्थांच्या कलात्मक अभिव्यक्तीचा अनुभव नाशिककरांना घेता येणार असून, कलाकारांची मेहनत, प्रतिभा आणि सर्जनशीलता पाहण्याची संधी मिळेल, अशी माहिती स्पर्धा समन्वयक राजेश जाधव यांनी दिली.
नाटकांचे वेळापत्रक
१६ नोव्हेंबर- अनुभव मंटप, १९ नोव्हेंबर- केअरटेकर, २२ नोव्हेंबर- मृत्यू आधीच आला होता, २५ नोव्हेंबर- काळवेळ, २८ नोव्हेंबर- एक्सपायरी डेट, १ डिसेंबर-बेंच आणि बरेच काही, ४ डिसेंबर -हमीदाबाईची कोठी, ७ डिसेंबर – आता कुठे धाबे मन, १७ नोव्हेंबर – पिवळी भिंत, २० नोव्हेंबर- खेळ, २३ नोव्हेंबर- सव्वा जुडूम, २६ नोव्हेंबर- आमचा काळ मस्त होता, २९ नोव्हेंबर- श्याम तुझी ऑस इली रे, २ डिसेंबर- नेटवर्क प्रॉब्लेम, ५ डिसेंबर- रघुनाट्य ब्लॉगस्पॉट, ८ डिसेंबर- लेडिज सायकल, १८ नोव्हेंबर- दाह, २१ नोव्हेंबर-शेवंता जिती हाय, २४ नोव्हेंबर – एक धुरंधर तीन बलंदर, २७ नोव्हेंबर – काळीबंद पाऊस, ३० नोव्हेंबर- द रेड पेन ड्राइव्ह
३ डिसेंबर- मेले कोण, ६ डिसेंबर- नथिंग टू से.




