Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशFire News : भीषण अग्नितांडवात ६७ जणांचा होरपळून मृत्यू

Fire News : भीषण अग्नितांडवात ६७ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवासांपासून अमेरिकेतील (America) हवाई बेटावरील (Island of Hawaii) माऊई (Maui) येथे आग (Fire) लागली असून अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग काही आटोक्यात येत नसून आतापर्यंत या आगीने ६७ जणांचा बळी घेतला आहे….

- Advertisement -

Video : त्र्यंबकेश्वरला भाविकांची मांदियाळी; कमला एकादशी आणि शनिवारचा साधला पर्वकाळ

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हवाई येथे असलेल्या लहेना, पुलेहू आणि अपकंट्रीमध्ये आगीची भीषणता अधिक वाढत चालली असून गेल्या काही वर्षांमधील हा सर्वात जास्त भीषण वणवा असल्याचे बोलले जात आहे. तसेच या वणव्यात शहरांतील तब्बल २७१ हून अधिक इमारतींचे नुकसान (Damage) झाल्याचे बोलले जात असून अनेक वाहने जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे.

ब्रिटीशांपेक्षा भयंकर तुमचे कायदे; संजय राऊतांची मोदी सरकारवर सडकून टीका

तसेच आगीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी काही नागरिकांनी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. त्यापैकी १४ जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आल्याची माहिती समोर आली आहे. तर यातील जखमींना ओहु (Oahu) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे नाराज आहेत का? अजित पवार म्हणाले,….

दरम्यान, डोरा चक्रीवादळामुळे (Hurricane Dora) हवाईमधील वणवा जास्त वाढत चालल्याची माहिती अमेरिकेच्या हवामान विभागाने (US Weather Service)दिली आहे. तसेच आगीची भीषणता फार जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असून भारतातून नेलेला १५० वर्षांचा वटवृक्ष देखील आगीच्या भक्षस्थानी आहे. तसेच बेटावर पसरलेल्या आगीमुळे अनेक नागरिक मृत्यूशी झूंज देत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पुण्यात अजित पवारांची मेट्रोवारी, गर्दीतून उभ्यानेच केला प्रवास… पाहा VIDEO

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...