धुळे Dhule । प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान (Lakdya Hanuman) येथे आंतरपीक (intercropping) म्हणून गांजाची शेतीवर (cultivation of cannabis) स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखा (Local Crime Investigation Branch) व शिरपूर तालुका पोलीस पथकाने (Shirpur Taluka Police Squad) छापा (raiding) टाकून 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा 14 लाख 42 हजार 800 रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त (Seizure of wet marijuana) करण्यात आला. पोलिसांच्या छाप्यानंतर गांजाची शेती करणारे दोघे पसार झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पो.नि.हेमंत पाटील यांनी पथक तयार केले. मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी काल सायंकाळी तेथे छापा टाकला असता शेतात तूर, मका व कापुस या पिकात मध्यभागी अंदाजे तीन ते सहा फुट उंचीचे एकुण 487 गांजाची रोपे मिळून आलेत.
या कारवाईत एकुण 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा 14 लाख 42 हजार 800 रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गांजा लागवड करणारे मोहन शामा पावरा व भावसिंग भोंग्या पावरा दोन्ही रा.लाकड्या हनुमान यांच्यावर गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी पसार झाले. पोसई बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष पंचनामा केला. तपास पोसई संदीप पाटील हे करीत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोसई संदीप पाटील, पोहेकॉ.संदीप सरग, प्रकाश सोनार, पोकॉ.योगेश जगताप, महेंद्र सपकाळ, राहुल गिरी, किशोर पाटील, चालक हेमंत मिस्तरी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. गंगाराम सोनवणे, अनिल चौधरी, पवन गवळी, उदयसिंग पवार, पोना.सागर ठाकुर, आरीफ पठाण, पोकॉ.प्रकाश भील, मुकेश पावरा, भगवान गायकवाड, रणजीत वळवी व चालक पोहेकॉ.सईद शेख, पोकॉ.मनोज पाटील यांच्या पथकाने केली.