Wednesday, April 2, 2025
Homeधुळेयुपीआयडीव्दारे 77 हजार केले वर्ग, दोघांवर गुन्हा

युपीआयडीव्दारे 77 हजार केले वर्ग, दोघांवर गुन्हा

धुळे dhule। प्रतिनिधी

मोबाईलमधून (mobile) युपीआयडीद्वारे (Through UPID)परस्पर एकूण 77 हजार रूपये (77 thousand rupees) वर्ग करून सलून व्यावसायिकाची -salon professional= फसवणूक (Fraud) करण्यात आली. पैसे मागण्यासाठी गेले असता धक्काबुक्की करीत दमदाटी केली. याप्रकरणी दोन जणांविरूध्द देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आहे.

- Advertisement -

आई आणि पत्नीच्या डोक्यात फ्रायपॅन घालून निर्घुण हत्याBad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार

याबाबत भुषण देवीदास चित्ते (रा. मास्तरवाडी, नेहरू नगर, देवपूर) या सलून दुकानदाराने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या मोबाईलमधून युपीआयडी द्वारे खात्यातून तुफेल रजा अक्कर मेमन याने प्रथम 14 हजार, दुसर्यांदा 51 हजार आणि तिसर्यांना 12 हजार असे एकूण 77 हजार रूपये त्याच्या संमतीशिवाय ट्रान्सफर करून काढून घेतले. हा प्रकार 21 एप्रिल रोजी वाडीभोकर रोडवरील पंचायत समितीसमोर असलेल्या अतिथी अपार्टमेंटच्या गाळ्यामध्ये घडला.

चार युवकांचा पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्नपाण्यासाठी शिवसेना उबाठातर्फे हंडामोर्चा

त्यानंतर भूषण चित्ते हा तुफेल याचे वडील अक्कर मेमन (रा.जामदा मळा, चाळीसगाव रोड) यांच्या घरी पैसे परत मागण्यासाठी गेला असता त्याला धक्के मारून शिवीगाळ करीत हाकलून दिले. तसेच पुन्हा आमच्या दारात आला तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी तुफेल रजा अक्तर मेमन व त्याचे वडिल अक्तर मेमन या पिता-पुत्राविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ आखाडे करीत आहेत.

तरुणांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोन लाख रुपये लुटले

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...