Saturday, September 21, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९० टक्के मतदान

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९० टक्के मतदान

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले . मतदानात ग्रामस्थांचा मोठा उत्साह दिसून आला आहे. दरम्यान तालुक्यांत 90 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे .

पेगलवाडी (नाशिक )येथे वॉर्ड क्रमांक 2 व वॉर्ड क्रमांक 3 -अनुक्रमे 94 टक्के व 95 टक्के मतदान झाले.

शिवजीनगर येथे वॉर्ड 2 साठी 88 टक्के मतदान झाले.

विजयनगर डहाळेवाडी येथे प्रभाग 1 व 2 व 3 साठी अनुक्रमे 86 व 94 व 89 टक्के मतदान झाले आहे .

निवडणूक विभागाचे अधिकारी तहसीलदार दीपक गिरासे यांनी वरील माहितीला दुजोरा दिला आहे.

आरोग्य विभाग त्र्यंबकेश्वर यांचे कडून मतदाराची करोनाच्या पाश्वभूमीवर टेम्परेच तत्सम तपासणी करण्यात येत असल्याचे दृश्य पेगलवाडीत दिसले

असून या निवडणुकीत अटीतटी दिसून आली सर्वत्र पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या